गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

कल्पवृक्षाची मुळे .... !!


 

आईच्या गर्भात असतांना
तिच्या अतृप्त इच्छा
आणि मग, आपली गळणारी
अतृप्त वासनांची लाळ
वहातच राहते
आयुष्यभर   ....!
कधी येईल तृप्ततेचा ढेकर  …?
जेंव्हा आम्ही  रुजवू 
आमच्या  अंतर्गर्भात
सर्वव्यापी  … सर्वदूर
कल्पवृक्षाची मुळे  .... !!


                                 "समिधा"
1 टिप्पणी: