गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

काही लग्न न मोडताही … टिकवता येतात … !!काही लग्न न मोडताही   …
टिकवता येतात  … !!
टेकु लावून
कधी मुलांचे
तर कधी
मळकटलेल्या  संस्कारांचे
तर कधी
कुणाच्याही गावी नसलेल्या
घराण्याच्या इज्जतीचे   ....!!
आतून कितीही मोडलेले
तरी -
वर सुखाचा फेसपैक लावून
लपवता येतात कातडीवरचे
हिंसक डाग   …!!
किंवा आनंदाचा ब्लीच
लावून , उजळवायचा
आतला काळवंडलेला आत्मा   ....!!
मग  -
काही लग्न न मोडताही  …
टिकवता येतात   …!!
घरात एकमेकांना ओरबाड़त
रडत असतील   …
तरी -
बाहेर चिमटे काढत
हसता येतं   ....!!
खरवडून काढत असतील
मागचे पुढचे   …
आणि वेदना   …
मिठाच्या पाण्यात
बुडवत असतील  …
तरी -
उद्या सर्व ठीक होईल
या ठिगळांच्या
आत   .... :)
मग -
काही लग्न न मोडताही
टिकवता येतात  ....!!!!


                                " समिधा "

३ टिप्पण्या: