सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

"जेंव्हा तू ….."
जेंव्हा तू मिटत असतेस
तुझी एक एक पाकळी
तेंव्हा कासाविस होतात
तुझ्या मधुकंदावर  पोसणारे
सारेच   ....!!

त्यांना जाणीव नसते
जेंव्हा तू उमलत असतेस
उमलताना  तुला अपेक्षीत
असणा-या तुषारांची   ....!!

तुझे उमलणे ,
तुझ्यासाठी नसतेच कधी
तुझा जरी तो उत्सव असतो   …
त्यांच्या साठी मात्र असते जत्रा    …!!

म्हणूनच तुझी एक एक पाकळी

मिटते , कधी खुडते संसारी व्यवस्था !
तेंव्हा तुझ्या मिटतानाच्या
वेदनाही कळत नाहीत त्यांना   ....!!

वाटतात ही तुझी सारी थेरं
नकोसेपण त्यांच्या असण्याचा
आणि तुझी नकोशी मलूल काया
देठापासून वेगळी पडत जाते    …!!

खरंतर   …
अशी एक एक पाकळी
मिटत असतांना
तुला ओंजळीत झेलून
पुन्हा उमलायला
काय लागतं    .... ?
थोड़ी मुलायम माया
घट्ट आधाराने
लपेटलेल्या दुपटयासारखी   …!!!


                                                          " समिधा "  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा