रविवार, २ मार्च, २०१४

"हायकू "

   
     


 "हायकू " हा प्रकार जपान मधील एक अत्यंत लोकप्रिय असा काव्यप्रकार असून त्याची परंपरा सुमारे पाचशे वर्षांची आहे  ! या काव्यप्रकाराचे मूळ जपानमध्ये आठव्या शतकात उदयाला आलेल्या "काताउता " ह्या काव्यप्रकारात सापडते  !

      "हायकू"  म्हणजे  तीन  ओळींची जापानी कविता  ! या मध्ये निसर्ग अधिक सापडते  …! तरीही कवीला भावलेला त्याने पकडलेला एखादा क्षण  , एक स्पंदन   … कमी  शब्दात  स्वत:च्या मनातील भाव अभिव्यक्त करून वाचकांच्या मनाला भीडवणे   हे खरे कसब  म्हणजे  "हायकू"

       मराठीत चारोळी , कणिका, वात्रटिक  हे काव्यप्रकारही शार्ट अण्ड स्वीट आहेत पण ते हायकू नाहीत !

       मराठी "हायकू काव्य" साहित्य विश्वात आदरणीय शीरीष पै  यांचे स्थान सर्वात अग्रस्थानी आहे  !

शिरीष पै यांनी १९७५ मध्ये प्रथम हायकू है जपानी काव्य प्रकार मराठी मध्ये आणला आणि रुजवलाही !!

"थोड़ा पाऊस पाहिला
बाकीचा घरात राहून
दिवसभर ऐकला। ....!!"

किंवा

"रेडियो खरखरतोय
सुरेल गाणेही
कानाला त्रास देतोय   ......!!"


यासारखे काही क्षण अलगद चिमटीत पकडावेत आणि हळूच सोडून द्यावेत असा अनुभव म्हणजे हायकू

मीही एक प्रयत्न केला आहे ,


" वा-याची झुळूक
 फांदी हलवून गेली
आईविना पाखराला झुलवुन गेली। ...!"




                                                                                                  "समिधा"

२ टिप्पण्या: