शुक्रवार, १० जुलै, २०१५

"आतला माणूस....."माणूस कपड्यातला
माणूस कपड्याच्या आतला
वेगळा असतो   … ?
जसा कातडीचा कोणताही
रंग असो   … तो आतून
वेगळाच असतो   .... !!
माणूस जेंव्हा आतून ग्रे शेडचा
असतो   ....
आणि कपडे मात्र पांढरे शुभ्र
घालतो  ....
तेंव्हा तो स्वतःशी प्रतारणा
आणि इतरांशी व्यभिचार
करतो  …?
आतल्या शेड्स प्रमाणे कपडे
 घालून तो कसा फसविल
 इतरांना …?
आणि मग सर्वांच्याच जगण्यालाही
शेड्स कशा मिळतील   .... ?
या आतल्या रंगांमुळेच तर
सभोवतालच्या जीवनाकाशात
रंग भरतात   ....
प्रत्येकाचे वागणे इतके
लवचिक होते   .... की
आपण अड्जस्ट होतो   …
कुठेही, कसेही , कुणाशीही   …!
आपल्यातही आपल्या जगण्यातही
वेगवेगळ्या रंगांच्या
शेड्स उतरतात हळूहळू   ....!!!


                                     "  समिधा  "३ टिप्पण्या:

 1. आपण म्हणाला ते खर आहे,

  "आपण अड्जस्ट होतो …
  कुठेही, कसेही , कुणाशीही …!"

  पण या मागे आपला काहीतरी विचार नक्कीच असणार. पण तुम्हाला वाटत का कि हे दर वेळी गरजेच आहे ? मला तर नाही वाटत. त्यातही असा विचार केला, की ही कविता एका स्त्री ने केली आहे तर अस मनाला वाटूनच जात कि adjust करणं हे स्त्रियांच्या स्वभावातच असत. मी तर या मताचा आहे की केवळ आपल्या आतल्या रंगामुळे आपण कुणाशीही adjust करू नये.

  बाकी सर्व नेहमीप्रमाणे, अगदी आतून लिहिलेलं. या छान लेखाबद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा