बुधवार, १ एप्रिल, २०१५

"सांगते ऐका ....!"

"सांगते ऐका ....!

सांगते ऐका  … 
मेल्यानंतर 
जमीनीत गाडूच नयेत माणसं  … 
पुन्हा त्यांना कोंब फुटतात  जगण्याचे 
आणि उगीच थडगी होऊन जगणा-यांना 
प्रश्न करतात   …!!

सांगते ऐका  … 
मेल्यानंतर 
जाळू नका माणसं  … 
श्वासा सोबत डोळ्यांनाही जड़ करतात धुराने 
आणि उगीच जीव जाळीत जगणा-यांना 
रडवतात  …!!

सांगते ऐका  …
मेल्यानंतर 
वेशीवर टांगा प्रेत माणसाचं  … 
देतील कुणी आशिर्वाद , कुणी देतील शिव्या शाप 
पाप पुण्य , कुणी पाहिलाय आत्मा   …?
आणि कुंणीच स्वर्ग नरक न पाहणा-यांना 
पाहू देत मुक्ती  देहातून देहापार  …!!


                                                  "समिधा"

१२ टिप्पण्या:

  1. मेल्यानंतर
    वेशीवर टांगा प्रेत माणसाचं …
    देतील कुणी आशिर्वाद , कुणी देतील शिव्या शाप
    पाप पुण्य , कुणी पाहिलाय आत्मा …?
    आणि कुंणीच स्वर्ग नरक न पाहणा-यांना
    पाहू देत मुक्ती देहातून देहापार …!!

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम समिधाजी. पण पहिल्या दोन कडव्यांच्या तुलनेत. शेवटचे कडवे काहीसे मार खाते. त्यातला विचार नीटसा पोहचत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शरीरातून प्राण गेल्यावर कुणी आत्मा -परमात्मा, स्वर्ग -नरक पाहिला आहे ? माणसाची मोक्ष मुक्ती म्हणजे नेमके काय ? म्हणूनच शरीराचे चांगले वाईट भोग इथेच भोगुन घे आणि देहापासून देहापार झालेला "आत्मा" असेलच तर निष्कलंक, निरागस आत्मा जाऊ दे स्वर्ग असेल तर स्वर्गात …!!
      अर्थात हा माझ्या संकल्पनेतून आलेला अर्थ आहे…! प्रत्येकाची दॄष्टि अजुन वेगळे अर्थ काढण्याची शक्यता आहे . विजय सर ही कविता जेंव्हा मी फेस बुक वर पोस्ट केलि तेंव्हा ती कुणाला हिंदू धर्मा विरुद्ध भाष्य करणारी वाटली , तर कुणाला धर्मा पलीकडे जाऊन मुक्तीचा विचार करणारी वाटली ! असो . तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच मार्गदर्शक वाटतात !

      हटवा
  3. आणि कुंणीच स्वर्ग नरक न पाहणा-यांना
    पाहू देत मुक्ती देहातून देहापार …!!

    Khare aahe.. Khuup man sunn karanari kavita....

    उत्तर द्याहटवा

  4. नेहमी प्रमाणेच हि सुद्धा विचार करायला लावणारी कविता आहे. शेवटच्या कडव्याबद्दल थोडंस लिहाव वाटतंय.

    माणूस आपल्या जनमानसात असणाऱ्या प्रतिमेबद्दल खूप जागरूक असतो. या संदर्भात मला अस वाटत कि ज्याप्रमाणे अल्फ्रेड नोबेलने आपला मृत्युलेख वाचल्यानंतर आपली जनमानसातली प्रतिमा बदलण्यासाठी नोबेल पुरस्कार सुरु केले आणि केलेल्या वाईट कामांची थोडीफार भरपाई केली त्याप्रमाणे जर तसाच प्रसंग आपल्या देशात कुणाबद्दल घडला, तर काय सांगावं, काहीतरी चांगल घडून येईल.

    आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे शेवटच्या कडव्यात लिहिलं आहे ते वर्णन हे इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याला दिलेल्या शिक्षेशी मिळतजुळत आहे आणि तो हुकुमशहा होता त्यामुळे त्याला नरकवेदना मिळाल्या.

    अर्थात, हा मी काढलेला अर्थ आहे आणि मला वाटत कि हा सुद्धा एक वेगळा कंगोरा असू शकतो या कवितेचा.

    उत्तर द्याहटवा
  5. श्रीपाद उपलकर तुम्ही अगदी योग्य तोच अर्थ आणि अतिशय नेमक्या शब्दात माझ्या शेवटच्या कडव्याचा आशय स्पष्ट केला आहे . यातून कवितेतून नेमका आशय तुमच्या सारख्या प्रगल्भ वाचकांच्या प्रतिक्रियेतून मिळाला की खुप आनंद होतो ! आणि माझ्या कवितेसाठी अश्याच
    वाचकांची अत्यंत गरज आहे. धन्यवाद श्रीपाद उपलकर. !

    उत्तर द्याहटवा
  6. मला सांगायला अभिमान वाटेतो की, अविनाश दुधे सर , विजय शेडगे सर आणि आदिविज यांच्या सारखे
    वाचक आणि मार्गदर्शक मला या कवितेने दिले आहेत. सर्वांचे खुप खुप धन्यवाद !!

    उत्तर द्याहटवा