सोमवार, २१ मार्च, २०१६

पैंजण ....!जेंव्हा फेर धरून नाचत असते
माझे वर्तमान ,
भविष्याच्या तालावर  .....
तेंव्हा मध्ये मध्ये
पायात अडकतो भूतकाळ   ....!
तेंव्हा स्वत:ला सावरतांना
पुन्हा एकदा ते मरण जगून घेते   ...!!
आणि खोलवर पायाखाली
दाबून ठेवते भूतकाळ  ....
चिरडला नाही जाणार
माहीत झालंय   !
म्हणून भूतकाळाचे
करून पैजण , पायात बांधलेत
आता ते पायात येत नाही ,
भविष्याच्या तालावर  त्यानेही
फेर धरलाय  .....!!!

                               " समिधा "

३ टिप्पण्या:

  1. भूतकाळाचे पैजण बांधून वर्तमान नाचते भविष्याच्या तालावर ... खूप छान विचार...


    भूतकाळाच्या पैजण आवाजाने वर्तमान आणि भविष्य सुखकर होऊ शकते. ते पैजण कायम आपल्याला आपल्या भुताची आठवण करून देते आणि त्याप्रमाणे आपले वर्तमान आणि भविष्य आपल्याला हवे तसे नाचवू शकतो..

    उत्तर द्याहटवा