बुधवार, ६ एप्रिल, २०१६

मनूचा मनोरा .....मनूचा मनोरा आता ढासळतोय  ...!
कारण  ....
शेजारणीला नव-याचा
मार खाताना
पाहून बायका आता
हसत नाहीत  …!
तिच्या जखमांवर उतारा
म्हणून आंबे हळद लावतात
आणि पाठीवर
आधाराचा हात ठेऊन
लढ म्हणतात  ….!!
ही तर  उत्क्रांती ….
नवा मनोरा उभारायची   ….!!!

                               " समिधा " 

३ टिप्पण्या:

  1. शेजारणीने मार खाण्याचे दिवस आता खूप मागे पडले आहेत. दलित कवी जसे जुन्या वेदनांचे अजूनही नव्याने भांडवल करीत आहेत तसे आपण करू नये.

    उत्तर द्याहटवा