सोमवार, २१ मार्च, २०१६

कविता :


भोवतालचं सोसणं
जेंव्हा असह्य होतं
नाती फाटत , तुटत
भावना उसवत जातात
तेंव्हा तूच येतेस   ....
एक एक टाका घालत जातेस
सांधत जातेस मला  .
विस्कटलेल्या आयुष्याला
स्वप्नांची ठिगळं लावतेस
सजवून जातेस असं काहीं   ....!
निळ्याभोर आकाशालाही
वाटत राहतं   ....
चंद्रचांदण्यांच्या जागी
स्वप्नांची ठिगळं
शोभून दिसतील  .....!!


                                          " समिधा "२ टिप्पण्या: