शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

"की " & "का" ( ती आणि तो )

त्याचा प्रवास  नेहमीच 
तिच्या शरीरापासून  सुरू होतो   ..... 
तिच्या मनाच्या आवर्तनांना 
लांघुन तो शरीरापार होतो   ....!!
अनं ती , त्याच्या शरीरातून 
येणा-या आवर्तनांत 
मनासह  स्वतःला स्वाह: करते …!!
तो  पोहचत असेल 
शरीरापार असलेल्या तिच्या 
आत्म्या पर्यंत    ....?
अनं ती , समर्पणाच्या  यज्ञात
स्वाह: समिधा  होऊन
पोहचत असेल  तिला
हव्या असलेल्या मोक्षापर्यंत  … ?


                                                 "समिधा" 

२ टिप्पण्या:

 1. लांघून म्हणजे स्पर्शून म्हणायचे आहे का तुम्हाला?

  छान वाटली कविता....मतितार्थ पण कळाला...पण ...एक खटकले
  .. फक्त तीच का?? तिलाच आत्मा आणि मोक्ष का? तो पण आहे ना त्या प्रवासात? हा प्रवास तसा एकट्याचा नाहीच मुळी... तो दोघांचा एक होण्यात .. दोघांनी स्वाह: होण्यातला असायला हवा ना ?? !!!!

  sorry please correct me if I am wrong.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. दोघांनी स्वाह: होण्यातला असायला हवा ना ?? !!!! पण तसे होते का ...?

   हटवा