गुरुवार, ३ मार्च, २०१६

कळेल का कुणाला सावलीची व्यथा ....?

she is shadow of her huband paintings साठी प्रतिमा परिणाम

कळेल का कुणाला
सावलीची व्यथा
जावे जेथे जेथे शरीराने
टेकवी माथा  ....!!!
अहेवलेणं  पुजतांना  ....
तुझ्याच पाठी
तुझ्याचसाठी
झाली कितीही फरफट
ब्र नाही काढणार
तिने घ्याव्या
किती  शफथा  ....!!!
उनपाउस वादळवारा
पारंब्या  होऊन झेलावा सारा
मनाचा करून सुगरन खोपा
विसावा द्यावा
शरीर नाथा  ....!!
सावलीचे जेंव्हा हरवे शरीर
शोधित फिरते आस-याला घर
वणवण करी भुकेच्या दारी
सावलीच ती मातीतच होती
मातीत मिळाली
होऊन चोथा  ....!!
सावलीला असावे
स्वत:चे शरीर ,
स्वत:चे मन
स्वत:च्या भोवती
स्वत:चेच कुंपण
सावलीला असावे
स्वत:चे  विचार
 प्रश्नही पडावित
शोधावी उत्तरं 
उत्तरात जरी
पुन्हा प्रश्नांचाच जत्था 
तरीही तिनेच  लिहावी
तिची चित्तर कथा   .....!!
सावलीला कळेल का
सावलीची व्यथा  .... ??


                                            "समिधा "

२ टिप्पण्या: