बुधवार, १३ जानेवारी, २०१६

" तर एक दिवस ( इति मनुष्य मनुष्यः ......!!!)



godhra kand साठी प्रतिमा परिणामskeleton साठी प्रतिमा परिणाम

अशीच जर माणसे तोडत
राहतील झाड़पान
पाणी  पाऊस बुजवत
राहतील  ....
माणसं धर्म जात
वंश भेदाच्या सुळावर
चढ़त राहतील   ...
किडया मुंग्यांना चिरडावी
तशी माणसं  माणसांना
चिरडू लागतील  ...
धर्मयुद्धाच्या आखाड़यांमध्ये
लढता लढता बन्दूकींच्या
सरणांवर रचलेल्या
बोंम्बगोळ्यांच्या चितेवर
पेटू लागतील   .....!
तर एक दिवस  माणसांचे
उरतील फ़क्त सांगाडे
आणि सांगाड्यांच्या ढिगाऱ्यांवर
राज्य करतील कीड़े मूंगे  ......!!
कीड़े मूंगे मस्तवाल टगे
सांगाड्यांची करतील
वस्ती धारावी    .....!!
आणि बांधतील तिथेच
सांगांड्यांच्या इमारती
माणसांनीच कापलेल्या
झाड़ा झुंडपांची प्रेतं
आणि सभोवतालच्या
रखरखित उन्हात
सुकलेल्या गटारींचे
प्लॉटही विकत घेतील   ...!!
आणि फक्त तेच वळवळतील
सांगाडयांंच्या भिंतींपाशी
आणि कवट्यांच्या कुंड्यांमध्ये
फुलवतील त्यांच्या
विष्ठेच्या बागा  ...!!
आणि दिसतील
किडया मुंग्यांच्या
रांगत जाणा-या
रांगा  .... !!
एखाद्या सांगाडयांंच्या म्यूझियम मध्ये
न जन्मलेल्या अर्भकाला पहायला   ......!!!
इति मनुष्य मनुष्यः   ......!!!

                                                     

ही कविता सुचली म्हणण्यापेक्षा ती मी  पाहिली  माझ्या स्वप्नात  .  तेच स्वप्न कवितेमधून व्यक्त केले आहे  .
कुणाला मी व्यक्त केलेल्या कल्पना अतिशयोक्तिपूर्ण वाटतिल पण ते माझ्यासाठी अपरिहार्य होते  . 

                                                                                                      "समिधा "
                                                                                                           .


३ टिप्पण्या:

  1. अल्बर्ट आईनस्टाईनने एकदा म्हटल होत, "Imagination is more important than knowledge". त्याच हे वाक्य अगदी खर आहे हे तुमच्या कवितेवरून समजतंय. आपण उपमा देण्यासाठी कल्पनेचा खूपच छान वापर केलाय...

    उत्तर द्याहटवा