भांडी चुपचाप असतात …
वापरून वापरून चमक गेलेली तीही
आणि तुही .... !
रोजचाच त्यांचा नकोसा आवाज
आणि मुर्दाड चेहरा …
रात्री जेवणानंतर खरकटी होउन
पडतात बाजूला … तीही
आणि तुही …!
तुला राग येतो तुझ्यातल्या बाईचा … आईचा
तुझ्यातल्या जाग्या अस्मितेचा …
परंपरा आणि पुरोगामी पारंब्यांना
त्रिशंकु सारख्या लोंबणा-या तुझ्या
अस्तित्वाचा …!!
तुला हवा असतो मोकळा स्वतंत्र श्वास
पण तो दबलेला घराच्या भिंतीत …
आणि घराचा उंबरठाही तुला पाय घालून
पाडतो …!
मग तू किचनमधल्या भांडयांवर
प्रहार करतेस …
तुझा राग भांडयांवर काढ़तेस …!
काय असते ते …?
तुझा दबलेला आवाज !
तुझा व्यवस्थेविरुद्धचा टाहो !
की , समाजपुरुषाविरुद्धच्या
बंडाची नांदी …?
की, शरणागती तुझ्यातल्या अस्मितेची …??
" समिधा "
अविश्वसनीय.
उत्तर द्याहटवाDhanyavad Vijay sir...!!
हटवा