गुरुवार, १९ मार्च, २०१५

"तिची साडी …! "

  
तिची साडी फारच सुंदर होती  .
सोनेरी वर्खाचे मोठे काठ
साडीभर नाजुक फुलांचा सडा
आणि
वळणदार हिरव्या वेलींची नक्षी
रंगही अगदी स्वच्छ , डोळ्यांना सुखावणारा  …
एकूणच , या साडीसाठी तिने
चांगलीच कींमत मोजली असेल  ....
तसे सांगतच  होत्या तिच्या
कपाळावरच्या घड़या  … !
सुंदर हेवा  वाटावी अशा साड़ीसारखे
तिचे नशीबही असेल का  … ??


                                       " समिधा "


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा