मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

माझी कविता आजकाल ........!!!!

 माझी कविता आजकाल
माझाच डोळा चुकवत  असते    ....
माझ्याशी ओळख नसल्या सारखी
माझ्याकडे पाहत असते   .... !!!

मी  तिला फुलांच्या बागेत
मुलायम पाकळ्यांमध्ये  खेळवत असते  … !!
कधी पियाच्या मिठीत तर  कधी
आठवणींच्या दुलईत जोजवत असते
अगदीच विरहात असले म्हणजे  
तिच्याच कुशीत प्रेम शोधत असते  …!!

माझी कविता आजकाल
खुप बदलत आहे   ....
तिला फुलांच्या बागा
मुलायम पाकळ्यांखाली
जळते निखारे
जमिनीच्या भेगा
पाण्याची वणवण डाचत  असते

पियाच्या  मिठीत 
घराचे छप्पर   …
उद्याची भाकर  …
लेकरांचं  दप्तर  …
वाटतले दगड  …
रस्त्यावरची खड़ी  टोचत असते

आठवणींच्या दुलईत
घराचं अंगण
अंगणातली तुळस
पावसाचा भोवरा
भोव-यातलं  घर  दिसत असते   …

विरहात आता
सुखाचा शोध   …
दुःखाची कुशी   …
आसवांची सहानभूति मिळवत  असते   ....!!!


                                              
                                                          " समिधा "७ टिप्पण्या:

 1. Tumhi prem virah hya kavitechya pudhe jaat aahat aani jvalant vushyanna pan hat ghalat aahat....jeep it up!

  उत्तर द्याहटवा
 2. माझी कविता आजकाल
  खुप बदलत आहे .... खरंच.
  नुसती कविताच नव्हे तर तुमचं एकंदर लिखाणाच आजकाल बहरत आहे. आणि मागे मी तुम्हाला हेच सुचवल होतं कि इतरांच्या कोट्स पोस्ट करण्याऐवजी स्वतः लिहित जा. हो आणि हो माझी विधानसभेला दिवस गेले हि राजकीय वात्रटिका वाचली कि नाही ?

  उत्तर द्याहटवा
 3. माझी कविता आजकाल
  खुप बदलत आहे ....

  तुमची कविताच नव्हे एकूण लिखाणाच छान होतं आहे. आणि मी तुम्हाला सुरवातीपासून हेच सांगत होतं. इतरांचे कोट्स पोस्ट करण्याऐवजी स्वतः लिहित चला.

  उत्तर द्याहटवा