बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

इतकं सोप्प नसतं गं ………!






















इतकं सोप्प नसतं गं  ………!
 जमिनीच्या  एका तुकड्यातून 
 दुस-यात रुजनं  …!
 मुळासकट स्वत:ला 
 उपटून   …
 मातीत मिसळणं   ……!!!


इतकं सोप्प नसतं गं  ………!
एकाच मनात   
मनाची शकलं करून 
जगणं  ....!
आणि प्रत्येक जगण्यात 
स्वत:चा शोध  …  
घेत राहणं    .......!!!


इतकं सोप्प नसतं गं  ………!
अवति भवतीच्या
गोंगाटात
आतला आवाज ऐकणं  ……!
उठल्यापासून
मिटेपर्यंतचा प्रवास
असा एकट्यानं  करणं   …… !!!

इतकं सोप्प नसतं गं    .......!
प्रत्येक भोगाला
नियतीचं  फळ  समजून
ओटित घेणं   …… !
आणि अहेवलेणी  मोक्षासाठी
सतीचं वाण पेलणं  ……!!!


                     " समिधा "


                                         



१६ टिप्पण्या:

  1. इतकं सोप्प नसतं .......!
    प्रत्येक भोगाला
    नियतीचं फळ समजून
    ओटित घेणं …… !

    उत्तर द्याहटवा
  2. एकाच मनात
    मनाची शकलं करून
    जगणं ....!



    अवति भवतीच्या
    गोंगाटात आतला आवाज ऐकणं ……!
    उठल्यापासून
    मिटेपर्यंतचा प्रवास
    असा एकट्यानं करणं …… !!!

    प्रत्येक भोगाला
    नियतीचं फळ समजून
    ओटित घेणं …… !

    Varil sarva kalpana apratim!!!! aatun aalela aawaj watato eka stricha!
    khuup chhan Kavita! Touching to heart.

    उत्तर द्याहटवा
  3. छान समिधा. चला एक चांगली कवयित्री भेटली. keep it up.

    उत्तर द्याहटवा
  4. Nadi jashi naisargikpane aaplya pravahanusar vahat aste tevdhyach naisargikpane tumchya kavitene mazya dolyat ashruncha pravah tayar kela...........

    aani dusar mhanje 'मनाची शकलं करून जगणं' mhanje kay ast yacha mala purepur anubhav aahe tyamule hi kavita manala khup bhavli

    इतकं सोप्प नसतं गं .......!
    प्रत्येक भोगाला
    नियतीचं फळ समजून
    ओटित घेणं …… !
    ya kharatar manachya bandhala bhednarya oli aahet....... kupach chhan....


    Ya apratim kavitesathi tumhala manapasun dhanyavad karan ya kavitemule mi swatahchya bhavnanna neetpane punha ekda samjun gheu shaklo tyamule man halak zalyasarkh vatatay......

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद श्रीपाद …! खुप छान समजून घेतली आहेस ही कविता ! मला तुझे विशेष कौतुक वाटते कारन ही कविता अधिकतर स्त्रीच्या भवविश्वाशी अधिक भिड़ते … ! पण तुझ्या अनुभवावरून माझी ही कविता सार्वत्रिक अनुभवाचा अविष्कार आहे हे तुझ्या या प्रतिक्रियेमुळे समजले .! प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद !

      हटवा