नवी नवेली
डोळ्यातले स्वप्न। ….!
नव्याचे नऊ दिवस
झाले भग्न ….!
पहिल्याच दिवाळीत
फाड़ फाड़ थोबाडीत ….!
चार बुकं शिकून
मास्तरिन झालीस …?
हाताला पिरगळुन
कोप-यात ढकलली …!
सासुनं देऊन हात ….
अगं पती म्हणजेच परमेश्वर ….
त्याला कसली मात ….!
नव-याला प्रश्न करतीस …?
मग खायची लाथ ….!!!
शिकून शहाणी झालेली …
बाई बी 'मानुस' असती
याची जाण आलेली …!
कदी मदी प्रश्न करायची
अनं ….
उत्तरा जागी
थोबाडीत बसायची …!
आता ती .....
आत आत मिटलेली
आसवं पुसून …
आवंढा गीळायची
सुजलेल्या चेह-यानं
पाणी भरायची
सडा सारवण करून
निमूट सारे ऐकायची
वाटलंच काही मनावेगळ
तर … लगेच मन आवरायची ….!!
पती म्हणजेच परमेश्वर
रोज धड़ा गिरवायची ....!
बुकात शिकलेल्या
सगळ्या गोष्टी
सरपण म्हणून
चुलीत ढकलायची ….!!!
अनं ….
पुसलेल्या रांगोळीत ….
पुन्हा पुन्हा नवे स्वप्न …
नवे रंग भरायची ……!!!
"समिधा "
sundar
उत्तर द्याहटवाअतिशय संवेदनशील..सुंदर.
उत्तर द्याहटवाAbhipyabaddal dhanyavad....!!
उत्तर द्याहटवा