शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

बाई बी 'मानुस' असती .....?

                                      
 

 नवी नवेली
डोळ्यातले स्वप्न। ….!
नव्याचे नऊ  दिवस
झाले भग्न   ….!
पहिल्याच दिवाळीत
फाड़ फाड़ थोबाडीत   ….!
चार बुकं शिकून
मास्तरिन झालीस   …?
हाताला पिरगळुन
कोप-यात ढकलली   …!
सासुनं देऊन हात   ….
अगं  पती म्हणजेच  परमेश्वर ….
त्याला कसली मात  ….!
नव-याला प्रश्न करतीस   …?
मग खायची लाथ  ….!!!
शिकून शहाणी झालेली   …
बाई बी 'मानुस' असती
याची जाण आलेली  …!
कदी मदी  प्रश्न करायची
अनं  ….
उत्तरा जागी 
थोबाडीत बसायची   …!
आता ती .....
आत आत मिटलेली
आसवं पुसून   … 
आवंढा गीळायची
सुजलेल्या चेह-यानं
पाणी भरायची
सडा सारवण करून
निमूट सारे ऐकायची
वाटलंच काही मनावेगळ
तर  … लगेच मन आवरायची    ….!!
पती म्हणजेच परमेश्वर 
रोज धड़ा गिरवायची  ....!
बुकात शिकलेल्या
सगळ्या  गोष्टी
सरपण म्हणून
चुलीत ढकलायची   ….!!!
अनं   ….
पुसलेल्या रांगोळीत  ….
पुन्हा पुन्हा नवे  स्वप्न  …
नवे   रंग भरायची   ……!!!


                                 "समिधा "
३ टिप्पण्या: