जेंव्हा "तू " फक्त
तू असतोस
तेंव्हा तुझ्याभोवती
लगड़लेली इतर
कोण असतात ……?
इतर कोणाचाच
जेंव्हा तुझ्या
अस्तित्वावर हक्क
सांगितला जातो ……
तेंव्हा तू कुठे असतोस ……….?
जेंव्हा "तू " तुझ्याभोवती
सुखशांतिचा
बुरखा पांघरतोस
अनं सगळ्या
दु:खांना बिनधास्त
सामोरा जातोस
तेंव्हा मात्र तू
फक्त एकटा का असतोस ……. ?
"समिधा"
जेंव्हा "तू " फक्त
उत्तर द्याहटवातू असतोस
तेंव्हा तुझ्याभोवती
लगड़लेली इतर
कोण असतात ……?
Vichar karayla lavnari kavita !!!
Abhiprayabaddal Dhanyavad...!
हटवा