माहीत नाही … कुठुनसा
आला तो …!
शोधत "भारत "
एकलय त्याने
सोन्याचा धुर …निघतो जिथून ?
जसा जसा तो फिरत गेला
शोधत सोन्याचा धुर …
की माणसांचा पुर …. ?
जिथे खाणा खुणा दिसल्या मराठीच्या
दबलेल्या परप्रांतियांच्या टाचांखाली
या विरुद्ध ओरडतात …. आंदोलने करतात … !
काही हक्क मागतात …….
पण - नंतर कळले त्यांनीच वसवल्यात
वस्त्या त्यांच्या व्होट बँकेच्या
थैल्या भरायला ……!!
इथेच पडलाय दुष्काळ
पण खंत कुणाला
बाहेर पडतोय रोज
नवीन एक घोटाळा ……!
दुष्काळ्याला दुष्काळी म्हणायला
ओळख लागते …… !
फाटलेल्या संसाराची लक्तरे
जागोजागी टांगायाला लागते
त्याची उघडी वाघडी फरफट
मीडिया टीपते …… तेंव्हा कुठे
माणुसकीला पाझर फुटताना
दिसते ……. !!!
तिथून उठला आणि
पुढे निघाला . . . . .
तिकडे जम्मू काश्मीर
आसाम तडकला
रक्ताच्या थरोळ्यात
तिरंगा पेटला ……!
मुबंई ,दिल्ली, हैदराबाद
बॉम्बस्फोटाच्या "आतिशबाजित "
हादरला ……!
माणसांचा आक्रोश
अश्रूंचा लोट …लोटला ……
तांबडया , पिवळ्या , पांढ-या
कार्डाच्या जातीत …. आता
आधारकार्ड … नव्या जातीची भर ….
पडली ……. !
तरी मोड़ता नाहित आले
कोणाला मनातले बांध
हिन्दू मुस्लिम वाद , आणि जातीचे खांब …!
ते पाहून तर
त्याचे डोळे पांढरेच झाले
कायद्याला गूंडाळणारे
कायदे पंडित झाले
चोराला सोडून …पोलिसालाच बदडले …. !
खरं बोललात तर खबरदार
नव्या आणिबाणीचा नवा अवतार …. !
घश्यातला हुंदका त्याने
डोळ्यातही दाबला …… !
अनं … कोप-यात जाउन
तो रड रड रडला ……. !
"सगळ्यांचे पाहिले त्याने
घरातले बंड
नव्या गुलामीचे नवे साखळदंड" ……!
तरी सारे आलबेल
ज्याचा त्याचा चाललाय खेळ
पाहून थक्क झाला तो
"भारत माझा महान " नावाची
अफूची गोळी …
घेउन …… झोपलाय प्रत्येक हिंदुस्थानी
झोपलाय प्रत्येक हिंदुस्थानी ……!!!!!!
"समिधा"
कायद्याला गूंडाळणारे कायदे पंडित झाले chhan
उत्तर द्याहटवाThanks Tai...!
हटवाThanks Manaswi tai....!
उत्तर द्याहटवा"भारत माझा महान "
उत्तर द्याहटवाझोपलाय प्रत्येक हिंदुस्थानी ……!!!!!!
Nice one !!!
Thanks sir...!
हटवाघश्यातला हुंदका त्याने डोळ्यातही दाबला …… !
उत्तर द्याहटवाअनं … कोप-यात जाउन तो रड रड रडला ……. !
Class!!!!!
Thanks Aadi ji....!
हटवा