मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

कृष्ण माउली , कृष्ण साउली ...!!!! 

कृष्ण माउली , कृष्ण साउली
कृष्ण जगाची माया
तन मन माझे वाहिले मी
तुझ्याच रे कृष्ण पाया

कृष्ण माउली , कृष्ण साउली
कृष्ण जगाची माया
मुख प्रसन्न, नेत्र सुखद
लोभस रूप पहाते …… !!
चिंता व्यथा जगाची कथा
इथेच विसरुनी जाते ……. !!

कृष्ण माउली , कृष्ण साउली
कृष्ण जगाची माया
धुप दिप नको फुलांचे लाड
तुला रे भक्ताच्या भक्तीची  ओढ़
भक्ताच्या हृदयी मंदिर तुझे
जावे कशाला शोधाया

कृष्ण माउली , कृष्ण साउली
कृष्ण जगाची माया ……… !!!!
तन मन माझे वाहिले मी
तुझ्याच रे कृष्ण पाया ……… !!!!


                                                       ""समिधा ""


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा